प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वस्व गमावलेला व्यक्ती सुद्धा पुन्हा नव्याने उभा राहून आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो. आणि जगासमोर आदर्श ठेऊन सर्वांना आपल्या कामाची दाखल घ्यायला लावू शकतो. आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे एकेकाळी मुंबईच्या रस्त्यावर आपल्या हातामध्ये बॅग घेऊन विकणारे उद्योजक तुषार जैन. तुषार जैन सुरुवातीच्या काळामध्ये रस्त्यांवर बॅग विकत असायचे पण आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला आणि भरगोस यश मिळवले. सद्यस्थितीला तुषार जैन यांचं व्यवसाय २५० कोटींचा झाला आहे.
मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकायचे…
तुषार जैन यांच्या बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल, तशा जैन सुरुवातीच्या काळात मुंबईच्या रस्त्यावर बॅग विकत असतात 1992 साली हर्षद मेहता ने घोटाळा केला होता. त्यावेळी भारतातील अनेक लोकांचे पैसे बुडाले होते आणि त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे झारखंडचे व्यापारी मूलचंद जैन सुद्धा होते .आपली संपूर्ण जीवनात कमावलेली बचत मूलचंद जैन यांनी गमावली होती आणि याचा गोष्टीचा प्रभाव म्हणून मूलचंद यांचा मुलगा तुषार जैन यांना मुंबईच्या रस्त्यांवर बॅग विकावा लागल्या.
कष्टाला पर्याय नाही
आयुष्यात बरेच कठीण क्षण आल्यानंतर सुद्धा तुषार जैन यांनी कधीही हार मानली नाही आणि मनापासून कष्ट करून सर्वस्व झोकुन काम करत राहिले. बराच सकाळ संघर्ष केल्यानंतर तुषार जैन यांनी 2012 साली आपली स्वतःची कंपनी उभा केली त्या कंपनीचे नाव ठेवलं हाय स्पिरिट कमर्शियल व्हेंचर्स प्रायमेट प्रायव्हेट लिमिटेड. हीच कंपनी सध्याच्या काळात देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी बॅग बनवणारी कंपनी आहे. तसेच या कंपनीचं बाजार मूल्य सद्यस्थितीला 250 कोटी रुपये एवढे आहे. कंपनीचं मुख्य कार्यालय हे मुंबईत आहे. तर संपूर्ण देशामध्ये दहा कार्यालय आहेत.
क्वालिटी वर दिले लक्ष
2006 साली तुषार जैन यांनी प्रायोरिटी नावाचा त्यांचा पहिला ब्रँड निर्माण केला. त्या काळात प्रायोरिटी ही कंपनी दररोज फक्त 300 ते 400 बॅक तयार करायचे. त्यांच्या कंपनीचे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची कंपनी कमी पैशांमध्ये चांगल्या दर्जाची बॅग उपलब्ध करून देत असे. आणि तुषार जैन यांच्या मते हेच त्यांच्या यशाचे खरे कारण आहे तुषार जैन यांनी देशातील अनेक उद्योजकांना स्वतः प्रशिक्षण दिले आहे.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…