फक्त पुरुषांनाच नाही तर महिलांनासुद्धा बचत करण्याची सवय लागायला हवी. जर ती नोकरी करत असेल किंवा गृहिणी असेल तर तिने पैसे वाचवायला हायेत किंवा गुंतवायला हवेत ज्यामुळे तिला खूप फायदा होईल. investment खूप चांगली सवय आहे आणि त्यांने पैसे वाढवण्यास खूप मदत होते.
आज आम्ही तुम्हाला अशा काही योजनांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक केल्यानंतर हि कसलाच धोका नसेल विशेष म्हणजे या योजना महिलांसाठी विशेष महत्वाच्या आहेत.
महिला सन्मान बचत योजना हि योजना अतिशय उत्तम योजना आहे. महिलांना गुंतवणूक करण्यासाठी अतिशय उत्तम साधन या योजनेला म्हणता येईल. या योजनेची सुरुवात फक्त महिलांसाठी करण्यात आलेली आहे. महिला सन्मान बचत योजना या योजनेमध्ये महिला २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात, यावर महिलांना ७.५ टक्के व्याजदर बहाल केला जातो, तुम्हाला जास्तीत जास्त २ वर्षे यामध्ये ठेव ठेवता येऊ शकते. या योजनेच्या आधारे महिलांना मजबूत परतावा मिळतो. विशेष म्हणजे यामध्ये कोणती हि जोखीम नाही. नॅशनल सेव्हिंग स्कीम हि योजना देखील महिलांना गुंतवणुकीस एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत महिला १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकतात. तसेच या योजनेतसुद्धता महिलांना ७.५ टक्के व्याज मिळते. परंतु या योजनेत तुम्हाला ५ वर्षांची गुंतवणूक करावी लागते.
भविष्य निर्वाह निधी हा गुंतवणुकीसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी पर्याय मानला जातो. यामध्ये जर महिलेने पशांची गुंतवणूक केली तर ती सहजतेने आपले भविष्य सुरक्षित करू शकते. या योजनेत महिलांना कमीत कमी ७ टक्के व्याज मिळते. या योजनेमध्ये महिला वर्षाला १ लाख रुपये गुंतवू शकतात.मुलींना पैशांची गुंतवणूक करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमार्फत १० वर्षापर्यंतच्या मुलींना खाते उघडता येऊ शकते. या योजने अंतर्गत सादर खात्यामध्ये २५० रुपयांपासून १.५ लाख रुपयांतपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. सध्याच्या काळामध्ये सरकार या योजनेअंतर्गत केल्या गेलेल्या गुंतवणुकीवर ८ टक्के व्याजदर देत आहे.
या प्रकारे महिलांना वेगवेगळ्या योजनांमार्फत गुंतवणूक करता येऊ शकते. तर तुम्हाला हा लाख कसा वाटलं आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी विचार वादळ संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या.