इथे एक तारखेला आपल्या भारताचं बजेट सादर होणार आहे. म्हणजेच आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर होतं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाला लोकांसमोर मांडणार आहेत. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प आपल्या देशासाठी खास असणार आहे. कारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होते.
लोकसभेच्या होणार असलेल्या निवडणुकांमुळे यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग सहावा अर्थसंकल्प असेल यापूर्वी मोरारजी देसाई यांनी सुद्धा सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. आणि यावर्षी सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सुद्धा सहाव्या वेळी अर्थसंकल्प सादर करून मोरारजी देसाई यांच्याशी बरोबरी करते. यावर्षी उन्हाळ्यामध्ये निवडणुका होणार असल्यामुळे या वर्षीचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणून सादर केला जाईल. तसेच सध्या असलेल्या लोकसभेचा कार्यकाळ मे महिन्यामध्ये संपेल.
अर्थसंकल्प म्हणजे बजेट पण तुम्हाला बजेट या शब्दाचा अर्थ माहित आहे का?
येत्या दिन तीन दिवसात आपल्या भारत देशाचं budget सादर होईल. परंतु. तुम्हाला budget या शब्दाचा अर्थ माहीत आहे का? तुम्ही विचार केलाय का कधी? की हा budget शब्द कुठून आला. तर बजेट हा इंग्रजी शब्द आहे. तुम्हाला माहित असेल, इंग्रजी भाषेत बरेचसे शब्द दुसऱ्या भाषेमधून आयात केलेले आहेत. त्याचप्रमाणे बजेट हा शब्द सुद्धा दुसऱ्याच भाषेतून आलेला आहे आधी बजेट हा शब्द फ्रेंच मधील Bougette पासून आला आहे. या शब्दाचा अर्थ फ्रेंच मध्ये लेदरची ब्रिफ केस असा होतो.
निर्मला सितारामन यांच्या काळामध्ये एक प्रथा बदलली ती म्हणजे 2019 पर्यंत भारताचा अर्थसंकल्प हा एका ब्रिफ केस मधून आणला जायचा. परंतु 2019 नंतर त्याचं स्वरूप बदललं आणि त्याचा संपूर्ण श्रेय निर्मला सितारामन यांना जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण 2019 मध्ये ज्यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प देशासमोर सादर केला. त्यावेळी त्यांनी अर्थसंकल्प लेदर ब्रिफ केस मधून न आणता लाल रंगाच्या बहीखात्यामध्ये आणला होता. आणि त्यावेळी लेदर ब्रिफिकेशन सर्वांचा निरोप घेतला.