आपल्या कष्टामध्ये प्रामाणिकपणा ठेवणारे आणि त्यामध्ये सातत्य आणि हुशारी दाखवणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचंच सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ज्वेलरी ब्रँड (Jewellery Brands) या कंपनीचे प्रमुख टीएस कल्याणरामन.
टीएस कल्याणरामन यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ज्वेलरी चा व्यवसाय सुरु करताना सुरुवातीला कर्ज घेतले होते आणि कष्ट आणि परिश्रमातून त्यांनी त्यांचं स्वतःच असं जग उभारून १७,००० कोटींचा व्यवसाय तयार केला.
अनेक शहरांमध्ये ज्वेलरी ब्रॅण्ड्स च्या शाखा
तुम्ही प्रत्येक शहरामध्ये फिरताना ज्वेलरी ब्रँड मधील सर्वात मोठा ब्रँड म्हणजेच कल्याण ज्वेलर्स ची पाटी सगळीकडेच पाहिलीच असेल. जवळपास प्रत्येक शहरामध्ये कल्याण ज्वेलर्स ने आपली शाखा उघडलेली आहे.
उद्योजक कल्याणरामन यांचा जन्म केरळ राज्यात असलेल्या त्रिशूर या ठिकाणी झाला. चांगली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीचं फळ किती सुंदर असू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कल्याणरामन यांचं आयुष्य. शून्यापासून सुरुवात केल्यानंतर अनेक लोक आपल्या हुशारी च्या जोरावर मोठ्या उंचीवर आपलं स्थान निर्माण करतात. त्यापैकीच एक म्हणजे टीएस कल्याणरामन. टीएस कल्याणरामन यांचं जन्म एका व्यापारी घरात झाला होता. सर्व उद्योग व्यवस्थित असून सुद्धा आपल्या वडिलांच्या व्यवसायाऐवजी त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एका बँकेकडून कर्ज काढले आणि उद्योजकांसाठी एक आदर्श अशा कल्याण ज्वेलर्स ची स्थापना केली आणि आज कल्याण ज्वेलर्स हा भारतातील स्वयंपूर्ण आणि सर्वात मोठा दागिन्यांचा ब्रँड आहे.
देशात २०० पेक्षा जास्त दुकाने…
घरात वडिलांचा मोठा व्यवसाय होता असं असून सुद्धा टीएस कल्याणरामन यांना वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता यामुळे त्यांनी स्वतःचा आपला व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या दिशेने अभ्यास करण्यास सुरुवात केली व अभ्यास करून २५ लाख रुपये जमा केले परंतु सोन्याच्या दागिन्यांचे दुकान उघडायचे असल्याने २५ लाख रुपयांमध्ये ती गोष्ट शक्य नव्हती त्यामुळे त्यांनीं पुढील कामासाठी एका बँकेकडून तब्बल ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले.
याच पैशांच्या जोरावर त्यांनी पहिल्या दागिण्याच्या दुकानाची सुरवात केली आणि त्यांनी परत कधीही मागे वळून पाहिले नाही.आणि आता त्यांची भारतामध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त दुकाने आहेत.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…