आताच्या काळात सर्वच नागरिक क्रेडिट कार्ड वापरतात आणि Buy Now, Pay Later अशा पद्धती मुळे लोकांना क्रेडिट कार्ड वापरणे परवडत आहे, असे म्हणता येईल. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही त्यांना बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी वेगवेगळ्या बँक मधून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कॉल हि आले असतील. आणि त्यांच्याकडून असाही सांगण्यात येतं. कि तुम्हाला हे क्रेडिट कार्ड मोफत मिळेल आणि तुमच्या खर्चानुसार तुम्हाला रिवॉर्ड्स सुद्धा मिळतील आणि हे ऐकल्यावर सगळे भावतात आणि क्रेडिट कार्ड वापरण्यास सुरुवात करतात.
जवळजवळ सर्वच बँक क्रेडिट कार्ड वर कसलाच कर आकारत नाहीत. कसलाही कर नाही, मोठमोठ्या ऑफर, खरेदीवर सूट, खर्चावर रिवॉर्ड्स एवढं सगळं देऊन सुद्धा या बँकांना क्रेडिट कार्ड देणं परवडतं कसं? याच प्रश्नच उत्तर आपण आजच्या या लेखामधून जाणून घेणार आहोत. .
अशी होते कंपन्यांची कमाई…
क्रेडिट कार्ड कंपन्या या लोन बिझनेस सारखंच काम करतात. क्रेडिट चा अर्थच कर्ज असा होतो. यावरून सरळ सरळ कंपन्यांना व्याजातून उत्पन्न मिळते, याबरोबरच अनेक वेगवेगळ्या स्रोतांमधून या कंपन्या पैसे कमावतात.
व्याजातून कमाई…
आकडेवारीनुसार क्रेडिट कार्ड कंपन्या या सर्वात जास्त उत्पन्न हे ग्राहकांकडून मिळणाऱ्या व्यवमधून कमावतात. एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्ड चा वापर करून एखादी वस्तू विकत घेतली आणि त्याचे पैसे वेळेवर भरले नाही तर त्याचे जास्तीचे व्याज कंपनीकडून आकारले जाते .हे व्याज ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत सुद्धार शकते.
तसेच ईएमआय वर जे व्यक्ती एखादी वस्तू खरेदी करतात त्यांना १०-१२ टक्क्यांदरम्यान व्याजदर लागू शकतो. परंतु मागील वर्षीची आकडेवारी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. मागील वर्षी रिजर्व बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ वर्षात भारतातील लोकांनी क्रेडिट कार्ड वापरून जवळपास ४०० कोटी रुपये काढले आहेत.
वेगवेगळ्या फीज
बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड्स साठी मेम्बरशिप फी, जॉइनिंग फी हि मोफत असते परंतु एका वर्षानंतर कंपन्या फी आकारायला सुरुवात करतात. याचबरोबर क्रेडिट कंपन्या कशी ऍडव्हान्स फी, लेट पेमेंट फी, बॅलन्स ट्रान्सफर फी, फॉरेन ट्रान्सफर फी यांसारख्या फीज करताना दिसतात यातूनही त्यांना मोठा फायदा होताना दिसतो..
तर तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…