केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अंतरिम बजेट (Budget) मध्ये एका नव्या गृहनिर्माण योजनेबद्दल एक मोठी घोषणा केली यामध्ये केंद्र सरकार भाडाने राहणाऱ्या चाळी झोपडीत किंवा अनाधिकृत कॉलनीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर देणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना सरकार आणण्यात यशस्वी ठरणार आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना नवीन घर खरेदी करण्यासाठी म्हणजेच गृह निर्माण साठी मदत करताना दिसेल. या योजनेमध्ये केंद्र सरकार सबसिडी तसेच त्यावरील व्याजदरात मोठी सोडणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कर्जावरील असणाऱ्या व्याजात कर सवलत देण्याबद्दल ही केंद्र सरकार विचारात आहे.
किफायतशीर दरात मिळणार घर
- भारत देशाचे सरकार सर्वसामान्यांना एकदम परवडेल अशा दरात घर उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे. म्हणजेच यातून केंद्र सरकार मध्यमवर्गीय कुटुंबांना किंवा मध्यमवर्गीय व्यक्तींना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याच्या समजते. त्याचबरोबर प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आर्थिक मदतही देण्यात येईल. त्याचबरोबर परवडल अशा दरात घरासाठी मध्यम वर्गावरील आयकाराचे ओझे सुद्धा कमी करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. त्यामध्येच आयकर अधिनियम 1961 च्या अंतर्गत वेगवेगळे योजना आणि दर कपातीमध्ये भर देण्यात येणार आहे.
- कलम 80EE मध्ये घर खरेदीदारांसाठी गृहकर्जावर असलेल्या व्याजदरावर करा मध्ये कपात देण्यात येऊ शकते. जे व्यक्ती पहिल्यांदाच घर खरेदी करत आहेत त्या व्यक्तींना ही सवलत सरकार मार्फत देण्यात येत असते. त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत जे कर भरतात अशा दादांना जवळपास 50 हजार रुपयांपर्यंत सरकारकडून सवलत देण्यात येते. परंतु ही कपात कर्जाच्या व्याजावर अवलंबून असते कर्ज किती दिवस आहे म्हणजे कर्ज किती कालावधीसाठी आहे याचा विचार करून ती कपात केली जाते.
अशी आहे योजना
शहर नियोजन आराखड्यामध्ये या योजनेमुळे अमोल आग्रह बदल होतील असे दिसून येते. यामध्ये नगर रचना विभागाची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे इतर साहित्य तसेच आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून घर बांधलेला लागणारा खर्च खूप कमी करण्यात येणार आहे. व त्यासाठी तज्ञ लोकांचा मदत घेऊन काम करण्यात येईल बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांचा अतिशय विचार करून वापर करण्यात येईल. त्यामुळे सामान्य नागरिकांना अतिशय स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध होते. याच कारणामुळे कमी उत्पन्न गट म्हणजेच मध्यमवर्गाला स्वतःचे हक्काचे घर मिळण्यास मदत होईल.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…