बँक मधे किती रक्कम ठेवावी शिल्लक

प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पगारावर आपलं घर चालवणारे सर्वच लोक वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत खाते म्हणजे सेविंग अकाउंट चालू करत असतो. त्याचबरोबर काही व्यवसायिक आणि नोकरदार वर्ग चालू किंवा करंट खातेही चालवतात या दोन प्रकारे बँकांमध्ये आपण आपले स्वतःचे अकाउंट उघडू शकतो, परंतु बचत खाते वापरताना तुम्हाला काही किमान शिल्लक रक्कम तुमच्या खात्यामध्ये कायम ठेवावी लागते.

असा त्या बँकेचा नियम असतो. प्रत्येक बँकेची किमान शिल्लक मर्यादा रक्कम ही वेगवेगळी असते. काही लोक त्यांच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवताना दिसत नाही, परंतु त्यांच्या स्वतःच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. जर तुम्ही ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये शिल्लक ठेवली नाही तर तुम्हाला बँक दंड आकारू शकते. परंतु त्यामध्येही सर शून्य शिल्लक खाते असेल म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट असेल तर त्याला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज पडत नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्या ग्राहकांचे बचत खाते आहे. आणि ते खाद्य मेट्रो किंवा शहरी भागात भागातील एसबीआय बँकेच्या शाखा मध्ये आहे. तर त्या ग्राहकांना कमीत कमी तीन हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवणे आवश्यक असते. तर ग्रामीण भागातील ग्राहकांना दोन हजार रुपये रक्कम आपल्या खात्यावर ठेवावे लागते.

येस बँकेच्या ग्राहकांना किमान शिल्लक रक्कम ही 1000 रुपये ठेवावे लागते जर ते पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये शिल्लक नसतील, तर त्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

आयसीआयसीआय (ICICI) या बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावर कमीत कमी दहा हजार रुपये मासिक शिल्लक रक्कम ठेवावे लागते. त्याचबरोबर निम शहरातील आणि ग्रामीण भागामधील बँकेमध्ये असणाऱ्या बचत खात्यात ग्राहकांना अनुक्रमे पाच हजार आणि दोन हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकांना नियमित बचत खाते असले तर दहा हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावे लागते.

त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेच्या सेविंग खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी किमान मासिक शिल्लक रक्कम हे 10000 रुपये राखणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ती अट पूर्ण केली नाही तर तुम्हाला कोटक महिंद्रा बँक पाचशे रुपये दंड आकारते.