कम्प्युटर ची आवड? बीसीए करा आणि मिळवा चांगल्या पगाराची नोकरी…

करियर निवडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी खूप प्रयत्न करताना दिसतो. कारण सध्याच्या युगात करिअर साठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्याला नेमकं कोणत्या क्षेत्रात जावं आणि कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ नये हे कळत नाही. याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कॉम्पुटर ची आवड असते. जवळवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना कॉम्पुटर बद्दल सर्वच गोष्टी माहित असतात. परंतु अशावेळी त्यांना मित्रांकडून, आणि काही लोकांकडून त्यांना चुकीचे मार्गदर्शन मिळते आणि ते भरकटले जातात. अनेकांना असं वाटत कि संगणकाचे वेड चांगले नाही, आणि मग त्यात नेमका करिअर काय करणार? परंतु हेच वेड काहींना त्यांच्या जीवनात लाखो रुपये कमावून देत आहे. त्यामुळे तुम्हाला जर कॉम्पुटर शिकण्याची आवड असेल तर तुम्ही BCA बारावी नंतर एक उत्तमपर्याय तुमच्या शिक्षणासाठी निवडू शकता.

आजच्या काळात कम्पुटर चे शिक्षण म्हणजे प्रगतीकडे वाटचाल असे समजले जाते. आणि या डिजिटल युगात तुम्हाला कॉम्युटर बद्दल माहिती असणे किव्वा कॉम्पुटर चे शिक्षण घेणे अतिशय महत्वाचे झाले आहे तसेच या क्षेत्रामध्ये संधीही खूप आहेत . तुमहाला तुमच्या आईष्यात काही करून दाखवायचे असेल तर तुम्ही BCA मध्ये शिक्षण घेऊ शकता. बीसीए म्हणजे काय? BCA हा विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम आहे. ज्यामध्ये संगणक क्षेत्रातील संबंधित पदवी तुम्हाला प्राप्त करता येते.

यामध्ये कॉम्प्युटर एप्लिकेशन, वेब डेव्हलपिंग, प्रोग्रॅमिंग लँग्वेज, सॉफ्टवेअर डेव्हलपिंग, एप डेव्हलपिंग, कॉम्प्युटर सायन्स याविषयांचे सैद्धांतिक तसेच प्रॅक्टिकल ज्ञान आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये अधिक तज्ज्ञ होण्यासाठी MCA (एमसीए) ला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. बीसीए अभ्यासक्रम बीसीए हे तीन वर्षांचे पूर्णवेळ पदवीचे शिक्षण आहे. बीसीए चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ कॉम्पुटर एप्लिकेशन (Batchelor Of Computer Application) असा होतो. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हे बीसीए ला ऍडमिशन घेऊ शकतात.

या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी खूप कमी सरकारी महाविद्यालये आहेत त्यामुळे हे शिक्षण शक्यतो खाजगी महाविद्यालयात च करावे लागते. तर खाजगी महाविद्यालयांमध्ये या कोर्स ची फी दरवर्षी २० ते २५ हजार इतकी असू शकते. करिअर च्या संधी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर आणि रिसर्च च्या जोरावर फ्री लान्सर म्हणूनही काम मिळवू शकता. आणि तुमच्या मनासारखे पैसे कमावू शकता.

  • याबरोबरच आयटी क्षेत्रामधील संधी शोधून परदेशातही नोकरी ची संधी मिळवू शकता.
  • विप्रो, एचसीएल, गूगल, इन्फोसिस, ओरॅकल, डेल महिंद्रा यांसारख्या इत्यादी कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरी ची संधी मिळू शकते.
  • तसेच तुम्ही बीसीए पूर्ण केल्यानंतर सिस्टम ऑर्गनायजर, कम्प्युटर प्रोग्रॅमर, डेटाबेस एक्स्पर्ट, माहिती प्रणाली व्यवस्थापक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर, बँकिंग एक्स्पर्ट, अ‍ॅप्लीकेशन तज्ञ, वेब डिझायनर यांसारख्या विविध पदांवर अधिकारी म्हणून नोकरी करू शकतात.