देशभरातील अनेक विमा कंपन्या विविध योजनांद्वारे ग्राहकांना आकर्षित करत असतानाही, अजूनही मोठ्या लोकसंख्येला विमा कवचाचा लाभ मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) अधिकाधिक लोकांना विमा उपलब्ध करून देण्याचा आणि प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दिशेने IRDAI कडून एक नवीन प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ज्यामध्ये विमाधारकांना ३० दिवसांचा फ्री लूक कालावधी देण्याची तरतूद आहे.
पॉलिसीधारकांना मिळेल अधिक वेळ:
या नवीन ऑफरमुळे पॉलिसीधारकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. पॉलिसीच्या अटी आणि धोरणे समजून घेण्यासाठी त्यांना पुरेसा वाव मिळेल आणि कोणत्याही त्रुटी दुरुस्त करण्याची संधी मिळेल. सामान्यतः, फ्री-लूक कालावधीमध्ये पॉलिसीधारक कोणत्याही कारणास्तव पॉलिसी रद्द करू शकतो आणि विमा कंपनीला भरलेला प्रीमियम परत मिळवू शकतो. मात्र, यातून जोखीम प्रीमियम आणि वैद्यकीय तपासणी, मुद्रांक शुल्क यांसारख्या खर्चांची कपात केली जाते.
फ्री लूक कालावधी ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव:
सध्याचा १५ दिवसांचा फ्री लूक कालावधी ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. ग्राहकांना विमा गरजा समजून घेण्यासाठी अधिक वेळ देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे ग्राहकांना विमा कंपन्यांवर विश्वास वाढेल आणि विम्याच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजतील. जर ग्राहकांना पॉलिसीतील काही अटी योग्य वाटत नसतील किंवा पॉलिसी त्यांची उद्दिष्टे पूर्ण करत नसेल, तर त्यांना पॉलिसी रद्द करून परतावा मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
नामांकनावरही नवीन प्रस्ताव:
फ्री लूक कालावधी वाढवण्याच्या प्रस्तावासोबतच IRDAI ने नामांकन अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. आरोग्य आणि सामान्य विमा पॉलिसीसाठी नोंदणी आणि पॉलिसी परताव्यासाठी बँक खात्याची माहिती आगाऊ गोळा करणे आवश्यक आहे. IRDAI ने विमा कंपन्यांना ४ मार्च २०२४ पर्यंत या प्रस्तावांवर प्रतिक्रिया देण्याचे आदेश दिले आहेत.
IRDAI चे इतर प्रस्ताव:
नामांकनाचा तपशील मिळेपर्यंत विमा पॉलिसी जारी करता येणार नाही.
सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी नवीन पॉलिसी जारी करताना नामांकन तपशील घेणे आवश्यक.
पॉलिसीचे नूतनीकरण करतानाही नामांकन तपशील घेणे आवश्यक.
बहुतेक पॉलिसी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जारी करणे अनिवार्य.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…