आता मिळणार स्वस्तात सोनं, RBI ने सुरु केली ग्राहकांसाठी नवीन योजना…!

सोनं सर्वांना विकत घ्यायचं असतं परंतु सोन्याची किंमत मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडत नसते याच मुळे आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांसाठी एक नवीन योजना नव्याने चालू केली आहे. ज्यामुळे सोने विकत घेण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना यामुळे सहजरित्या सोने विकत घेता येणार आहे.

Sovereign Gold Bond Scheme
जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची इच्छा असेल पण सोन्याचे वाढलेल्या दरामुळे सोने विकत घेता नसेल आणि तर तुम्हाला यामुळे चिंता वाटत असेल. तर तुमच्यासाठी एक सर्वोत्तम सरकारी योजना (Government Scheme) आणण्यात आली आहे ज्यामुळे आता सर्वांना स्वस्त दरात सोने विकत घेता येणार आहे. जर एखाद्याने यामध्ये गुंतवणूक केली तर त्याला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. mhnjech जास्त नफा मिळवू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकने ‘सॉव्हरिन गोल्ड बॉंड’ या योजनेला पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. जे आता फेब्रुवारी मध्ये सुरु होणार आहे. या योजनेचा नवीन हप्ता या वर्षीच्या फेब्रुवारी २०२४ मध्ये नव्याने सुरुवात होत आहे.

स्वस्त सोनं कसं खरेदी करायचं?
भारतीय रिझर्व्ह बँकेने एक जुनी योजना सर्वांसमोर नव्याने नव्याने आणली आहे. आता या योजनेचा चौथा हप्ता लवकरच सुरु होणार आहे. या २०२४ मधील फेब्रुवारी मध्ये या योजने चा नवा हप्ता सुरु होतोय. हि ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या येणाऱ्या चौथ्या हप्त्याची सुरुवात येत्या १२ फेब्रुवारी पासून होणार आहे. हि ग्राहकांसाठी गोल्ड बॉंड या योजनेत पैशांची गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे.

सोने कसे खरेदी करावे?
तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर, तुम्ही NSE, BSE, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL) या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, पोस्ट ऑफिस तसेच तुमच्या जवळील बँकांशी संपर्क साधून तुम्ही सोने खरेदी करू शकता. तुम्हाला जर SGB च्या अंतर्गत सोने खरेदी करावयाचे असेल तर तुमचं KYC होणे आवश्यक आहे तसेच पॅनकार्ड सुद्धा जवळ असणं महत्वाचे आहे.

तर, तुम्हाला आजच आर्टिकल कसं वाटलं हे नक्की कळवा… आणि आवडल्यास आमच्या ‘विचार वादळ’ ला पुन्हा भेट द्या…