पेटीएम च दुकान बंद, शेअर आदळला, शेअर होल्डर चा काय असावा निर्णय…?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने २९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेटीएम च्या काही सेवांना बंद करण्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये ग्राहक खाते, वॉलेट, fastag, तसेच प्रेपेड इन्स्ट्रुमेंट इत्यादी ठेवी तसेच टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घालून त्यावर कारवाई केली आहे. बाह्य लेखापरीक्षा आणि सर्वसमावेशक सिस्टीम च्या अहवालाची पडताळणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बॅंक्स लिमिटेड विरुद्ध अतिशय कठोर पाऊल उचलले आहे. परंतु आरबीआय ने केलेल्या या कारवाईमुळे पेटीएम च्या स्टॉक वर भयंकर प्रभाव दिसून येत होता. ज्यावेळी गुरुवारी बाजार उघडला तेव्हा पेटीएम चा शेअर छगनलाच घसरलेला दिसून आला.

लोअर सर्किट ला गेला पेटीएम चा स्टॉक…
आरबीआय ने उचललेल्या या कठोर पावलांमुळे पेटीएम चे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी मार्केट उघडल्यावर पेटीएम चा शेअर चांगलाच घसरताना दिसला. तब्बल पेटीएम च्या शेअर्स मध्ये २०% ने घसरण झाली त्यामुळे घसरणीसह पेटीएम चा शेअर लोअर सर्किट ला जाऊन आदळला आहे. एवढा होऊनही पेटीएम च्या शेअर्स मधील पडझड अजूनहि थांबणे नाही असं सांगण्यात येत आहे. ब्रोकरेज फर्म जेफ्रिज च्या म्हणण्यानुसार पेटीएम चा स्टॉक अजून जास्त खाली घसरणार आहे.

ब्रोकरेज फर्म जेफरीज यांनी पेटीएम शेअर च्या रेटिंग मध्ये सुधारित अपडेट केले आहेत. आणि त्यांनी त्याला बाय वरून अंडरपरफॉर्मिंग असे केले आहे. त्याच बरोबर लक्ष किमतीमध्येही बदल करण्यात आला आहे. सध्याच्या किमतीमध्ये १०० रुपये कमी करण्यात आले आहेत म्हणजेच आता पेटीएम चा शेअर ५०० रुपयांपर्यंत आणण्यात आला आहे.

कारवाई पण ग्राहकांना मिळणार दिलासा…
बाह्य लेखापरीक्षा आणि सर्वसमावेशक सिस्टीम च्या अहवालाची पडताळणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम ला बऱ्याचश्या सेवांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत, परंतु या सर्व गोष्टींमध्ये ग्राहक होरपळू नयेत याचाही विचार त्यांनी केला आहे असे दिसून येते. कारण यामध्ये बँकेने बचत बँक खाते, चालू खाते, प्रेपेड इंस्ट्रुमेंट्स, फास्टग, यांच्या खात्यामधून शिल्लक रक्कम काढता येणार आहे म्हणजेच त्याची परवानगी आहे. असं आरबीआय ने स्पष्ट केलं आहे.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…