प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

उद्देश:

  • नैसर्गिक आपत्ती, कीटक आणि रोगराई यामुळे पिकांना नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक आधार देणे.
  • नवीन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
  • शेतीमध्ये टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे.
  • कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहणे, ज्यामुळे अन्नसुरक्षा लाभेल, पीक पद्धतीत बदल होईल, कृषी क्षेत्रात स्पर्धात्मकता येऊन कृषी तंत्राची वाढ होईल.

ठळक वैशिष्ट्ये:

  • अत्यंत कमी प्रिमियम (विम्याची संरक्षित रक्कम):
    • शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रिमियम दर अत्यंत कमी ठेवण्यात आले आहेत.
    • 90% पेक्षा जास्त भार शासनाकडून उचलला जाईल.
    • अन्नधान्य, डाळी, तेलबिया इत्यादी पिकांसाठी प्रत्येक हंगामासाठी एकच दर असेल.
    • पूर्ण विमा संरक्षण मिळेल आणि दावा रक्कम पूर्ण मिळेल.
  • विमा लाभ मिळण्यास पात्र परिस्थिती:
    • शेतत पाणी साठणे, पूर येणे अशा आपत्तींना स्थानिक संकट मानले जाईल.
    • प्रभावित शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून भरपाई किंवा दावा रक्कम दिली जाईल.
    • पीक काढण्याच्या दिवसापर्यंत जर पीक शेतातच असेल आणि त्या दरम्यान आपत्ती, वादळ, अवकाळी पाऊस आल्यास शेतकऱ्यांना दावा रक्कम मिळेल.

      अपवाद:

      • मानवनिर्मित आपत्ती (उदा. आग लागणे, चोरी होणे) यांचा या योजनेत अंतर्भाव नाही.

स्वरूप:

  • या योजनेत विम्याचा हप्ता 2 ते 2.5% पर्यंत आहे.
  • मोबाइल फोन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नुकसानीचे मोजमाप केले जाणार आहे.
  • निर्धारित वेळेत दावे निकाली काढले जातील.
  • ड्रोन, मोबाइल मॅपिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर नुकसानीचे मोजमाप करण्यसाठी.
  • शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळेल.

लाभ:

  • नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून बचाव.
  • पिकांच्या नुकसानीसाठी त्वरित आर्थिक मदत.
  • शेतीमध्ये गुंतवणूक वाढण्यास प्रोत्साहन.
  • कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थिरता वाढवणे.

अधिक माहितीसाठी:

टीप:

  • ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये राबवली जाते.
  • योजना राबवण्यासाठी संबंधित राज्यांच्या कृषी विभागांशी संपर्क साधा.