काय आहे Rooftop Solar Scheme… सोलर रूफ टॉप स्कीम साठी कोण करू शकेल अर्ज?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक घरासाठी सौरऊर्जेच्या योजनेची घोषणा केली होती. त्यामध्ये देशातील एक कोटी घरांवर सोलर सोलर पॅनल सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला वीज विक्री करून जवळपास वार्षिक 18 हजार रुपयांचा ही फायदा होऊ शकतो तर ही योजना नेमकं काय आहे? आणि या योजनेचा कोणाकोणाला लाभ होणार आहे हे आपण आजच्या या लेखांमधून पाहणार आहोत.

फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अंतर्गत अर्थसंकल्पांमध्ये निर्मला सीतारामन यांनी देशातील एक कोटी कुटुंबांच्या घरी सोलर रूफ टॉप स्कीम साठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची घोषणा केली. या मार्फत देशातील तब्बल एक कोटी कुटुंबात यामुळे शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान सूर्योदय योजनेची सुरुवात केली होती. तर ही योजना नेमकं काय आहे आणि त्याचा कोणाला लाभ घेता येईल हे आपण पाहूया.

वीज विक्री करून कमाई

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार आपणास एक पैसे कमावण्याची नवीन पद्धत हाती सोपवत आहे. ही केंद्र सरकारची सर्वात महत्त्वकांक्षी योजना मानण्यात येईल. देशात सोलर एनर्जीचा उपयोग आपण जर वाढवला तर देशाला बळ मिळेल. त्यामुळे अपारंपारिक ऊर्जेचा सर्व नागरिकांना किंवा सर्वसामान्यांना लाभ घेता येईल. शेतात छतावर सोलर पॅनल बसवून वीज उत्पादन करताय येणार आहे. त्याचबरोबर सर्वांना वीज विक्री सुद्धा करता येईल आणि त्यामधून कमाई सुद्धा ग्राहकांना करता येणार आहे.

कोणाला करता येईल अर्ज

– भारतीय असलेला नागरी किंवा भारतातील कोणतीही संस्था

– स्वतःचे घर असायला हवे किंवा त्यावर मोकळी जागा असणे आवश्यक

– छतावर सहजरित्या सोलर पॅनल बसवता येण्याची सुविधा असणे आवश्यक

– अर्जदाराकडे वीज जोडणी असणे आवश्यक