सूर्योदय योजना करणार “अशी” सर्वसामान्यांची अंधकारातून सुटका

प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी दिल्ली ला परतले आणि त्यांनी एक नवीन योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे सूर्योदय योजना. जी सूर्योदय योजना नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे ती एक सोलर प्रकल्प योजना आहे त्यामार्फत भारत देशातील घांच्या छतांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कि, सूयोदय योजनेच्या अंतर्गत देशातील १ कोटी पेक्षा जास्त घरांच्या छतांवर सोलर पॅनल बसवनिण्यात येतील.

योजनेची पंतप्रधान मोदींकडून घोषणा
अयोध्येतील प्रभू रामाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान दिल्ली ला पोहोचले आणि त्यांनी लगेचच एक मोठी घोषणा केली. ती अशी कि त्यांनी एक ट्विट केले आहे आणि त्यांनी त्या ट्विट मध्ये असे लिहिले कि, ” आज अयोध्येमध्ये झालेल्या अभिषेकाच्या वेळी माझ्या एका संकल्पाला आणखी बाळ मिळाले ते असे कि, आपल्या भारत देशातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतः चे सोलर रूफ पॅनल किंवा सोलर सिस्टीम यंत्रणा असावी. जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्रीरामांच्या वैचारिक प्रकाशामधून नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते,

जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमी ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझ्या संकल्पाला आणखी बळ मिळालं की, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. या योजनेच्या माध्यमातून देशातील १ कोटी लोकांच्या घराच्या छतावर सोलर सिस्टीम बसविण्यात येईल. आणि यामुळे देशातील गोरगरीब, सामान्य जनता कधी कधी वीजबिलाच्या तडाख्यात अडकते त्यातून त्यांची कायमची मुक्तता होईल”