टाटा ही भारतातील सर्वात विश्वासू कंपनी मानली जाते परंतु टाटा मोटर्स काही काळापूर्वी थोडी कर्जात होती. आता शुक्रवारी टाटा मोटर्स लिमिटेड ने तिमाहीचे निकाल लोकांसमोर मांडले. टाटा ग्रुप च्या टाटा मोटर्स या कंपनी ने डिसेम्बर तिमाही चे निकाल सादर केले त्यामध्ये टाटा मोटर्स ला सदर काळामध्ये १३३.३२ टक्क्यांचा म्हणजेच तब्बल ७,१०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे तर मागील वर्षी टाटा मोटर्स कंपनी ने ३,०४३ कोटी रुपयांचा नफा कमवला होता. कंपनी ने निवेदन दिले आहे त्यामध्ये कंपनी ने सांगितले कि या चालू आर्थिक वर्षांमध्ये असलेल्या तिसऱ्या तिमाही मध्ये वार्षिक महसूल २५% ने वाढला आहे आणि तो १,१०,६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कंपनी काय म्हणाली..?
टाटा मोटर्स ने निवेदन सदर केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले कि, “या वर्षांमध्ये आम्ही तिन्ही वाहन व्यवसायांवर सकारात्मक आहोत. जेएलआरमधील पुरवठ्यात सुधारणा आणि तसेच नवीन लाँच या दोन कारणांमुळे आम्हाला येणाऱ्या चौथ्या तिमाही (मार्च तिमाही) काळात कामगिरी अजून सुधारेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आत्तापार्यंत कंपनीकडून ९,५०० कोटी रुपयांची कर्ज कपात करण्यात आली आहे.
कंपनीच्या शेअर्स ची स्थिती
शुक्रवारी टाटा मोटर्स चा शेअर आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी ८८२.८० रुपयांवर क्लोज झाला होता तर गुरुवारी बाजारामध्ये अस्थिरता जाणवल्यामुळे टाटा मोटर्स च्या शेअर्स मध्ये थोडी कमजोरी नोंदवण्यात आली होती. याबरोबरच शेअरच्या कामगिरी बद्दल बोलल्यास एका महिन्यामध्ये टाटा मोटर्स चा शेअर ११ टक्क्यांनी वधारला आहे. तर मागील सहा महिन्यांमध्ये टाटा मोटर्स च्या शेअर्स ची किंमत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स च्या बाबतीत आता सर्व सुरळीत होताना दिसत आहे, त्यामुळे आता कंपनी चा शेअर गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊ शकतो. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…