Mukesh Ambani Information In Marathi
मुकेश अंबानी माहिती आपल्या देशातील उद्योजकांमधील अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे मुकेश अंबानी
मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात मोठे उद्योजकांपैकी एक आहेत, ते उद्योगपती, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत. भारतामधील बाजारपेठेमध्ये त्यांच्या कंपन्या सर्वाधिक मूल्यवान कंपनी म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्या संपूर्ण जगामध्ये 500 पेक्षा जास्त कंपनी आहेत. फोर्स मॅक्झिन नुसार मार्च 2019 पर्यंत मुकेश अंबानी आशिया मधील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते तर जगातील तेराव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मुकेश अंबानी यांचे अन्टेलिया हे जगातील सर्वात महागडे घर आहे. त्याच्या घराची किंमत हि जवळपास २०० दशलक्ष डॉलर म्हणजेच ११ हजार कोटी भारतीय रुपये इतकी आहे. असे म्हणतात कि हे जगातील सर्वात महागडे घर आहे.
या लेखामधून आपण मुकेश अंबानी यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मुकेश अंबानी जीवनचरित्र (Mukesh Ambani Biography In Marathi)
नाव (Name) – मुकेश धीरूभाई अंबानी
जन्म (Born) – एप्रिल १९,१९५७
जन्मस्थान (BirthPlace) – एडन, येमेन
निवास स्थान – अँटिलीया, मुंबई
आईचे नाव – कोकिलाबेन अंबानी
अपत्ये – अनंत अंबानी, आकाश अंबानी, इशा अंबानी
शिक्षण – केमिकल इंजिनीरिंग (BE)
मुकेश अंबानी यांचे सुरुवातीचे जीवन Early Life Of Mukesh Ambani
वडील धीरूभाई अंबानी आणि आई कोकिलाबेन अंबानी हे ब्रिटिश क्राऊन कॉलोनी मध्ये राहत असताना, येमेन मधील एडन या ठिकाणी १९ एप्रिल १९५७ या दिवशी मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म झाला. अनिल अंबानी हे मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ आहेत तसेच दीप्ती दत्तराज साळगावकर आणि नीना भद्रश्याम कोठारी या मुकेश अंबानी यांच्या दोन बहिणी आहेत. धीरूभाई अंबानी यांनी काही कारणास्तव १९५८ मध्ये येमेन सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला व ते भारतात वास्तव्यास परतले आणि त्यांनी ‘मसाले तसेच कापड’ व्यवसायाची सुरुवात केली. १९५८ ला भारतात परतल्यानंतर धीरूभाई अंबानी हे आपल्या कुटुंबासोबत मुंबई मधील भुलेश्वर भागामध्ये एका छोट्याश्या २ बेडरूम च्या अपार्टमेंट मध्ये राहू लागले. अंबानी कुटुंब १९७० पर्यंत या ठिकाणी राहत होते.
काही काळानंतर धीरूभाई अंबानी यांनी कुलाबा भागामध्ये ‘सी विंड’ नावाची एक १४ माजली अपार्टमेंट विकत घेतली. आताच्या काही काळापर्यंत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे याच अपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या मजल्यावर आपआपल्या कुटुंबासोबत राहत होते. मुकेश अम्बानीयांना हॉकीय आणि फुटबॉल हे खेळ खेळायला आवडतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन खेळ खेळून आनंद मिळवत असत.
मुकेश अंबानी यांचे शिक्षण (Education Of Mukesh Ambani In Marathi मुकेश अंबानी यांचे शिक्षण)
पेडर रॉड येथे असलेल्या हिल ग्रेंज हायस्कुल मध्ये मुकेश यांनी त्यांचे शालेय शिक्षण केले. त्यानंतर माटुंगा या ठिकाणी त्यांनी आपली केमिकल इंजिनीरिंगची पदवी पूर्ण केली १९८० मध्ये त्यांनी वडिलांना म्हणजेच धीरूभाई अंबांनी यांना रिलायन्स कंपनी सुरु करण्यास मदत केली.
मुकेश अंबानी यांचे कार्य आणि भूमिका (Business Of Mukesh Ambani In Marathi)
कार्यक्षेत्र : अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर रिलायन्स इंडस्ट्रीज
भाषा: हिंदी आणि इंग्रजी
पुरस्कार: वर्ल्ड कम्यूनिकेशन अवॉर्ड फॉर द मोस्ट इंफ्लुएंटीएल पर्सन इन टेलीकम्यूनिकेशन्स
राष्ट्रीयत्व: भारतीय
मुकेश अंबानी व्यवसाय Business Growth Of Mukesh Ambani
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या वडिलांसोबत व्यवसायाला सुरुवात केली. व रिलायन्स इंडस्ट्रीज चे काम सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांच्या कौशल्याने मोठ्या स्तरावर त्यांनी रिलायन्स ला नेले. बाजारपेठेतील मागणी पाहून त्यांनी वस्त्रोद्योग, ऊर्जा, नॅचरल रिसोर्सेस, पेट्रोकेमिकल इत्यादी क्षेत्रात पाऊल ठेवले. आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी किती उंची गाठली हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. जगातील सर्वांत मोठ्या आणि यशस्वी उद्योजकांपैकी एक नाव म्हणजे भारताचा अभिमान असलेले मुकेश अंबानी हे आहेत..
तर, तुम्हाला हा लेख कसा वाटलं हे नक्की आम्हाला तुमच्या कमेंट द्वारे कळवा आणि नवनवीन माहिती साठी विचार वादळ या वेबसाईट ला भेट द्या…