गुंतवणूक करायचीय पण पर्याय माहित नाहीये, हे आहेत गुंतवणुकीचे सोपे पर्याय…

वाढती महागाई आणि वाढत जाणारी गरज यामुळे दिवेन्दिवस सामान्य जनता अडचणीत येताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बचत कशी करावी? आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रत्येकाच्या विचाराची वणवण सुरु असते. पण बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत, एवढ्या कष्टाने कमावलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे? हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर असतो. परंतु हे पैसे कुठे गुंतवायचे हे माहित नसते आणि भीतीपोटी लोक गुंतवणूक करत नाहीत. अशा वेळी अल्पबचत योजना आणि बँक एफडी सर्वसामान्यांसाठी फायदेशीर पर्याय मानले जातात.

तर हेच आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. आपल्या कष्टाच्या कमाईची गुंतवणूक नेमकं कुठे आणि कशी करायची आणि त्याचा परतावा कसा मिळतो हे आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

अल्पबचत योजना आणि बँक एफडी या दोन योजनांमार्फत तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचे व्याजदर वेगवेगळे असू शकतात. बँक एफडी मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला निश्चित व्याजदर ठरवून योग्य तो परतावा मिळत असतो. त्याच बरोबर स्मॉल सेविंग्स स्कीम म्हणजेच अल्पबचत योजनेमार्फत दिला जाणारा व्याजदर हा जवळपास प्रत्येक बँकेत सारखाच असतो. अल्पबचत योजनेत अनेक प्रकारच्या योजनांचा समावेश केला जातो…

अल्पबचत योजनेमधील व्याजदर:
जानेवारी-मार्च २०२४ साठी अल्प आणि लघु बचत योजनेतील व्यजतदार सुधारीत करण्यात आला आहे. आणि तो खालीलप्रमाणे आहे.
बचत ठेवींवर ४ टक्के व्याज
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर ७.७%
किसान विकास पात्र ७.५% व्याजदर आहे तर हि योजना ११५ महिन्यात परिपक्व होते.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर ७.१%
सुकन्या समृद्धी खाते ८.२%
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ८.२%
मासिक उत्पन्न खाते ७.४%
एक वर्षाचे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट ६.९%
दोन पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट ७%
तीन पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट ७.१%
पाच पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट ७.५%
पाच वर्ष आवर्त ठेवी ६.७%

बँक मुदत ठेवी (Bank FD)
बँकाच्या एफडी मध्ये म्हणजे मुदत ठेवींमध्ये ठराविक काळासाठी सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. त्यामध्ये ५ वर्ष, ३ वर्ष, आणि ६ महिन्यांसाठी गुंतवणूक करू शकता. तर एफडी वर दिला जाणारा व्याजदर हा दरवर्षी बदलला जातो. एफडी चा कालावधी आणि व्याजदर हा ग्राहकाच्या वयानुसार ठरवला जातो किंवा निश्चित केला जातो.

तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…