आज एक फेब्रुवारी म्हणजेच भारतीय अर्थसंकल्प सादर होण्याचा दिवस अरुण जेटली अर्थमंत्री असताना त्यांनी 28 फेब्रुवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पाची तारीख बदलून 1 फेब्रुवारी केली. आणि तेव्हापासून भारतात चा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला व्हायला सुरुवात झाली आज भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहे.
विशेष बाब म्हणजे यावर्षी लोकसभा बरखास्त होत असल्यामुळे म्हणजेच लोकसभा निवडणुकांमुळे हा देशाचा अंतरिम अर्थसंकल्प असे जो नवीन कार्यकारणी किंवा नवीन सरकार स्थापन होईपर्यंत देशांमध्ये लागू राहील. त्यात आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातील महिलांसाठी कोणकोणते निर्णय घेतले त्याबद्दल ची आजची ही उजळणी…
तीन कोटी लखपती दीदी योजना…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन यांनी भारत देशाच्या विकासाबद्दल गेल्या दहा वर्षातील आलेख सादर केला. युवा महिला गरीब आणि शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे मोदी यांच्या सरकारने लक्ष केंद्रित केले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या काय-काय उपाययोजना राबविण्यात आल्या याबद्दल माहिती दिली
तसेच आता यावेळी वर्षी देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी योजनेत सहभागी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या एक कोटी महिला लकपदी असल्याचे किंवा त्यांनी करून दाखवल्या स्पष्ट केले.
संसदेत आरक्षणासाठी कायदा…
केंद्र सरकार ने संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला त्याचबरोबर तील तिहेरी तलाक प्रथा बंद केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पीएम आवास योजनेच्या मार्फत महिलांना 70 टक्के देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्याचबरोबर महिलांचा विकास व्हावा म्हणून इतर योजना बद्दलही त्यांनी माहिती दिली.
असा झाला योजनांचा फायदा
~ पीएम जनधन योजना चा आदिवासी समाजाचा फायदा
~ पी एम किसान योजनेमार्फत 11.8 कोटी लोकांना अर्थसहाय्य
~ देशातील 78 लाख फेरीवाल्यांना मदतीचा हात
~ चार कोटी शेतकऱ्यांना पीएम पिक विमा योजना मार्फत फायदा