आपण पाहतो कि पन्नाशीच्या नंतरच शक्यतो उद्योजक अब्जाधीश होतात परंतु काही अशे हि आहेत जे आपल्या तरुण वयातच अब्जाधीश झाले आहेत. आणि नवतरुणांना प्रेरणा देत आहेत. यामध्ये घेतला जाणारं नाव म्हणजे पर्ल कपूर, ज्याने २०२३ मध्ये Zyber 365 नामक सायबर सुरक्षा देणारी कंपनी तयार केली आहे आता त्या कंपनी ने फक्त तीन महिन्यात ९,८०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य गाठले आहे .
भारत एक संपन्नता असणारा देश आहे. परंतु आपल्याला अदानी आणि अंबानी सोडता दुसरे अब्जाधीश आठवत नाही परंतु आता तुम्हाला एक नाव लक्षात ठेवावं लागणार आहे ते म्हणजे पर्ल कपूर. पर्ल कपूर याने वयाच्या २७व्या वर्षी अब्जाधिशांच्या यादीत आपले नाव कोरले आहे.
Zyber 365 तीन महिन्यांमध्ये बनली युनिकॉर्न
पर्ल कपूरची यश हे त्याला त्यांनी स्थापन केलेली Zyber 365 कंपनीमुळे मिळाले. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्याला फक्त तीन महिन्यांमध्ये युनिकॉन कंपनीचा दर्जा मिळाला युनिकॉर्न चा अर्थ या स्टार्टअप कंपन्या आहेत. ज्या कंपन्यांचे मूल्य एक बिलियन किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहे अशा कंपन्यांना युनिकॉन कंपनी म्हणतात. Zyber 365 हे Web3 आणि Ai या दोन गोष्टींवर आधारित स्टार्टअप आहे. त्यामुळेच रिटेल क्षेत्रामध्ये सगळीकडे या एकच कंपनीचे चर्चा होत असताना दिसते आहे.
कंपनीचे मूल्यांकन ९,८४० कोटी रुपये
दर्पण कपूरच्या या कंपनीचे मुख्यालय लंडन शहरात आहे आणि कामकाज हे अहमदाबाद शहरामध्ये चालते विशेष म्हणजे आशियामधील आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणारा स्टार्टअप युनिकॉन स्टार्टअप म्हणून पर्ल कपूरच्या कंपनीकडे पाहिले जाते त्याच्या कंपनीचे मूल्य 1.2 अब्ज डॉलर इतके आहे.
तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे तुमच्या कमेंट द्वारे कळवा, तसेच लेख आवडल्यास ‘विचार वादळ’ ला सबस्क्राइब करा आणि नवनवीन विषयांसाठी आमच्या वेबसाईट ला भेट पुन्हा भेट द्या…